कोपरगाव तहसील कार्यालयात सोमवारी आ.आशुतोष काळेंचा जनता दरबार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सोमवार (दि.१०) फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय,कोपरगाव येथे सकाळी १० वा.आ.आशुतोष काळे जनता दरबार घेणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लागाव्या यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या जनता दरबारामध्ये कोपरगाव मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न तक्रारी अडी-अडचणी यांचे निवारण होत असून जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रशासकीय स्तरावरील प्रश्न सुटण्यास मोठी मदत होत आहे. सोमवार (दि.१०) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारात प्रामुख्याने महसूल विभाग,भूमी अभिलेख,वन विभाग व शेती महामंडळ आदी विभागातील तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसील कार्यालयात होणाऱ्या जनता दरबारात वरील विभागाच्या सबंधित ज्या सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत अशा नागरिकांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी या जनता दरबारात आपले प्रश्न, समस्या व अडचणी मांडाव्यात. आपले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा होवून त्याच ठिकाणी नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.