महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज-विवेक कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
राष्ट्राला विकसीत करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान हे डोक्यावर घेण्यासारखे आहे, मात्र ते डोक्यावर घेऊन डोक्यात घेऊन त्यांच्या विचारातुन कृतीत आणणे आवश्यक आहे, त्यामुळे विचारापूरते मर्यादित न राहता त्यांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. शिंगणापूर आणि संजीवनी परिसरातील सकल आंबेडकर समाज्याच्या वतीने आयोजित कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी जयंती निमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सकल आंबडेकरी समाज्याच्या वतीने अतिरिक्त खर्चाला फाटा देत गरिब व गरजू मुलांना शालेय साहित्य व १० सायकलीचे वाटप यावेळी करण्यात आले याप्रसंगी गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकल, शालेय साहित्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना झोपण्यासाठी बेडचे वाटप विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विवेक भैय्या कोल्हे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’. असा बहुमोल विचार दिला होता, त्या भावनेतून या समाज्याच्या लोकांनी शिक्षणासाठी मदत उभी केली आहे, याचे कौतुक वाटते, हाच भाव लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणखी १० सायकली देण्याचे जाहीर केले. या प्रसंगी सरपंच डॉ.विजय काळे सकल आंबेडकर समाजाचे अध्यक्ष विजय जाधव, उपाध्यक्ष अमोल वाघ, अतिश त्रिभुवन, संकेत मगर, अमोल जाधव, आकाश डोके, रोहित वाघ, सचिन पगारे, विशाल दाभाडे, विश्वास मोरे, सागर पवार, साईनाथ जाधव, राहुल लखन, प्रशांत आढाव, दत्तू नाना सवंत्सरकर, विलास सवंत्सरकर, यादवराव सवंत्सरकर, भिमा सवत्सरकर, बाळासाहेब सवंत्सरकर, शाम सवंत्सरकर, अशोक वराट, गणेश राऊत, सागर शिंदे, राजेंद्र काळे, तुषार साळवे, जितेंद्र रणशुर, दिपक गायकवाड, विजय त्रिभुवन, सचीन दाभाडे, राजश्रीताई काळे, सखुबाई काळे, बिजलाबाई काळे, सिंधुबाई काळे यांच्या सह शिंगणापूर व संजीवनी गेट येथील सर्व समाज बांधव व गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.