शासनाने हमीभाव दराने सोयाबीन खरेदीचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यात केले जमा-साहेबराव रोहोम (सभापती)

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शासनाने सन २०२४-२५ करिता सोयाबीन या शेतीमालाचा आधार भुत रूपये ४,८९२ /- दराने जाहिर केला असुन कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले आहे. तेथे शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाकरिता आधारभुत दर रूपये ४,८९२ /- या प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. सध्या सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प़्यात कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर ३७ शेतकरी वर्गाने ६३६ क्विंटल (१२७२ गोणी) सोयाबीन शेतमाल विक्री केलेला असुन त्याचे पेमेंट रक्क़म रुपये ४८९२ /- ने रक्क़म रुपये ३१,११,३१२ /- शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सभापती साहेबराव किसनराव रोहोम व उपसभापती गोवर्धन बाबासाहेब परजणे यांनी दिली आहे.सोयाबीन ऑनलाईन नोंदणीची मुदत दिनांक ३१/१२/२०२४ असुन बाजार समितीचे आज अखेर ९०० शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त़ शेतक-यांनी सोयाबीन ऑनलाईन नोंदणी करिता कागदपत्रांची बाजार समितीकडे पुर्तता करावी तसेच सोयाबीन ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकरी वर्गाने आपला सोयाबीन शेतमाल विक्रीस आणतांना काडी कचरा, माती विरहीत, बुरशी व जाळी नसलेला, FAQ दर्जाचा शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.