आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग १ च्या ७/१२ उताऱ्यांचे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते वितरण

0 5 4 1 1 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

खंडकरी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या त्यांच्याच जमिनीच्या उताऱ्यावर भोगवटादार २ अशी नोंद येत असल्यामुळे स्वत:ची जमीन असून सुद्धा त्या जमिनीचे हस्तांतरण होत नव्हते. त्यामुळे त्या जमिनीच्या उताऱ्यावर असलेली भोगवटादार २ हि नोंद रद्द करून भोगवटादार १ करावे अशी असंख्य खंडकरी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या मागणीबाबत महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जवळपास १२२ कोटीचा महसूल बुडविण्यात राज्याचे प्रशासन सहमत नसतांना महसूलमंत्री ना.विखे पा.यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर महसूल विभागाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचा कोपरगाव मतदार संघाला फायदा झाला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते खंडकरी शेतकऱ्यांना वर्ग १ च्या सात बारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, तहसीलदार महेश सावंत, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना तसेच विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी, खंडकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते कारखान्याचे चेअरमन पद देखील द्यायला तयार होतील

२०२३ च्या खरीप हंगामाच्या नुकसान भरपाई पोटी पिक विम्याची अग्रिम मदत ३५ कोटी १६ लाख दिलेली असून उर्वरित ७५ टक्केची ४४.४२ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असून एक लाख पर्यंत नुकसान भरपाई मिळाली आहे. सोयाबीन, कपाशी हेक्टरी पाच हजार अनुदान व दुध अनुदान प्रती लिटर सात रुपये वाटप सुरु आहे त्यामुळे तुमची दिवाळी गोड जाणार असून लाडक्या बहिणीचे पैसे बहिणीकडेच ठेवा असा सल्ला दिला. सोमवार दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अंतिम पेमेंट प्र.मे.टन १२५/- प्रमाणे जमा केले आहे व कर्मचाऱ्यांना देखील नेहमीप्रमाणे एकाच टप्यात २० टक्के बोनस देणार असून त्याचा कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी उपयोग होईल. परंतु सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून अशा वेळी नेहमीप्रमाणे विरोधक आमिष दाखवतील, असे आमिष दाखवतील की, त्यांच्या कारखान्याचे चेअरमनपद देखील तयार होतील. त्यामुळेअशा अमिषाला बळी पडू नका अशी टीका आ.आशुतोष काळे यांनी कोल्हेंवर नाव न घेता केली.

पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरालगत असलेल्या डेअरी पोल्ट्री व वळूमाता प्रक्षेत्राची असलेली जागा व औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय असेल किंवा शेती महामंडळाची जागा एमआयडीसीला देणे तसेच शेती महामंडळाच्या कर्मचारी व त्यांच्या वारसांना, घरकुल लाभार्थ्यांना व ग्रामपंचायतीला सार्वजनिक कामासाठी देण्याचा निर्णय मतदार संघासाठी अत्यंत फायद्याचा असून खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उताऱ्यावर असलेली भोगवटादार २ हि नोंद रद्द करून भोगवटादार १ करून महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी खंडकरी शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. त्याबद्दल मतदार संघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहे. या उताऱ्यावर इतर हक्कामध्ये शेती महामंडळ किंवा बायो-रिफाइनरी अशी येत असलेली नोंद देखील या उताऱ्यावरून दिवाळीपूर्वीच काढून टाका अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या त्या सूचनेचे उपस्थित खंडकरी शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे