Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण होऊ न देणाऱ्यांचा मातंग समाज बांधवांनी काळ्याफिती बांधून केला निषेध

अनावरण सोहळा हाणून पाडणाऱ्यांना मातंग समाज त्यांची जागा दाखवून देईल

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

ज्या सोहळ्याची मातंग समाज अनेक वर्षापासून प्रतीक्षा करीत होता तो सोहळा अर्थात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून संपन्न होणार होता. परंतु मातंग समाजाचा राजकीय उपयोग करून घेणाऱ्या कोल्हे कुटुंबाने व त्यांना सामील असलेल्या मातंग समाज द्रोह्यांनी हा अनावरण सोहळा होवू दिला नाही. त्या निषेधार्थ दिलीप तूपसैंदर, नितीन साबळे, बाळासाहेब पवार, राजेंद्र खैरनार, प्रवीण शेलार, सोमनाथ आहिरे, संपत चंदनशिव, दीपक आरणे, रमेश सोळसे, किरण आढागळे, सुनील वैरागर, संजय साळवे, एकनाथ राक्षे, तेजस साबळे आदी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. या बाबत मातंग समाजाचे कार्यकर्ते सोमनाथ आहिरे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षापासून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा काही चुकीच्या वृत्तींमुळे व त्यांना सहकार्य करणाऱ्या समाज द्रोह्यांमुळे रखडला होता. परंतु आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे सर्व मातंग समाज बांधवांच्या मागणीनुसार हा सोहळा सोमवार (दि.०७) रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय पद्धतीने होणार होता त्यामुळे सर्व मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र मातंग समाजाचा हा आनंद कोल्हेंना सहन न झाल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे काही मातंग समाज द्रोह्यांच्या मदतीने पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा होवू दिला नाही. त्यासाठी कुटील कारस्थान करून अनावरण सोहळा ज्यांच्या हस्ते होणार होता त्या अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना एवढी चुकीची माहिती दिली की, त्यांनी कार्यक्रमाला येण्यास नकार देवून समाज विरोधी कारवाया करणाऱ्या समाज द्रोह्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आमचे दैवत आहे. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळ्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना येण्यापासून रोखणाऱ्या मातंग समाज विरोधी कोल्हे कुटुंबाचा व त्यांना सामील असलेल्या समाज द्रोह्यांचा काळ्या फिती लावून निषेध जाहीर निषेध करीत असल्याचे सोमनाथ आहिरे यांनी सांगितले.यावेळी मातंग समाजाचे कार्यकर्ते नितीन साबळे म्हणाले की, कोल्हे कुटुंबाच्या दबावामुळे आमच्या समाजातील काही अपप्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने पुन्हा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण लोकार्पण सोहळा हाणून पाडला. मातंग समाजातील काही लोकांना कोल्हे कुटुंबाने अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना फोन करायला लावले. तुम्ही जर कोपरगावात प्रवेश केला तर,आम्ही तुमचा जाहीर निषेध करू, तुम्हाला काळे झेंडे दाखवू. तुम्ही कोपरगावात येऊ नका.समाजामध्ये वाद घडण्याची शक्यता आहे अशी कारणे पुढे केली. त्यावेळी समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी सचिन साठे यांनी व्हिडिओ क्लिप पाठवत कोपरगाव मध्ये कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असे सांगत समाज बांधवांनी आणि इतर घटकांची माफी मागितली त्यामुळे हा कार्यक्रम रद्द झाला.मात्र फकीरा चंदनशिव नामक समाज बांधवाला कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळी उपोषणाला बसवले त्यावेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण कार्यक्रमाला आले पाहिजे असा आग्रह धरायला लावला होता. परंतु कार्यक्रम रद्द होताच फकीरा चंदनशिव उपोषण सोडून उठलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यामुळे यामध्ये सुद्धा कोल्हे कुटुंबाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हात आहे असा मातंग समाजाचा आरोप असून प्रत्येक वेळी ते सिद्ध होत आले आहे याचा आम्ही निषेध करतो. जर फकीरा चंदनशिव उपोषणावरून उठलाच नसता तर मातंग समाजाला देखील वाटले असते की, तो स्वत: उपोषणाला बसला आहे मात्र उद्देश साध्य होताच त्याचे उपोषण अर्ध्यात सोडणे म्हणजेच त्याला कोणी तरी उपोषणाला बसवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मातंग समाजाची आ. आशुतोष काळे यांना विनंती आहे की, आचारसंहिता लागू होत नाही तोपर्यंत लवकरात लवकर हा अनावरण सोहळा होत असेल तर प्रयत्न करावे सर्व मातंग समाज बांधव तुमच्या बरोबर आहे. ज्यांनी हा कार्यक्रम होऊन दिलेला नाहीये त्यांना मातंग समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे नितीन साबळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या विचारांवर मातंग समाजाची वाटचाल सुरु आहे परंतु समाजातील काही व्यक्तींना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार महत्त्वाचे नसून त्यांना विरोधकांचे विचार महत्त्वाचे वाटतात. त्यांचाच विचार घेऊन त्यांनी या अनावरण सोहळ्याला विरोध केला व सोहळा पार पाडू नये यासाठी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांना फोन केले. याचा समाजाच्या माध्यमातून निषेध करणे योग्यच आहे. या सोहळ्याला जो काही विरोध झाला आणि सोहळा स्थगित करावा लागला त्यामुळे या घटनेचा मी देखील निषेध करतो. विरोधक राजकीय पोळी भाजण्यासाठी सातत्याने मातंग समाजाची दिशाभूल करून त्यांचा वापर केला आहे. त्यामुळे मातंग समाजाला निश्चितपणाने जाणीव झाली असेल की, समाजाचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी कोण खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो. मला खात्री आहे की, येणाऱ्या काळामध्ये मातंग समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »