आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

मंजूरमध्ये कोल्हे गटाला मोठे भगदाड आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0 5 3 8 2 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटीच्या वर निधी आणून मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधत हा विकास मतदार संघातील जनतेच्या दारापर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आमच्या जीवन मरणाचा अर्थात मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्यामुळे त्यांना यापुढे राजकीय विरोध करणे चुकीचे आहे हि आमच्या अंतर्मनाची भावना असल्याचे सांगत मंजूर येथील भाजप-कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.आ. आशुतोष काळे यांनी मंजूर येथे विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उत्स्फुर्तपणे कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हे गटाच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत. आ.आशुतोष काळे यांनी विकास कामे करत असतांना मतदार संघातील प्रत्येक गावाला न्याय दिलेला आहे. मतदार संघातील मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता आणि ते प्रश्न फक्त आ.आशुतोष काळेच सोडवू शकतात असा विश्वास देखील नागरिकांना होता.सत्ताधारी पक्षाचा आमदार कशा प्रकारे विकासकामे करू शकतो याचा आदर्श तयार करून हे सर्वच प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी निकाली काढले आहेत. त्यामध्ये मंजूर येथील गोदावरी नदीवरील असलेला बंधारा हा एकोणीस वर्षात ३ वेळेस वाहून गेला होता आणि त्यामुळे परिसरातील शेती व शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते.

शासन स्तरावर आ.आशुतोष काळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत मंजूर बंधारा दुरुस्ती कामाकरीता ४१.५१ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. तसेच मंजूरचे प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर देवस्थानचा विकास, देर्डे फाटा-मोर्विस (सात मोऱ्या) रस्ता आदी प्रमुख विकास कामांसह अंतर्गत रस्ते व विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून यातुन अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मंजूर पंचक्रोशीसह मतदार संघातील नागरिकांमध्ये सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.प्रवेश केलेल्या कोल्हेंच्या कार्यकर्त्यांमध्ये संभाजीराव तांगतोडे, राघव तांगतोडे, विजय वालझडे, अमोल तांगतोडे, वाल्मिक तांगतोडे, सागर तांगतोडे, विनायक पायमोडे, राजेंद्र गावंड, मयुर कदम, सागर कदम, शुभम कदम, गणेश शेटे, सोमनाथ बर्डे, अनिल पवार, भागवत पवार, सोमनाथ पवार, सुभाष पवार, ज्ञानेश्वर बर्डे, भाऊसाहेब निकम, सर्जेराव बर्डे, नवनाथ बर्डे, चांगदेव बर्डे, अशोक बर्डे, किशोर भवर, बाळासाहेब गांगुर्डे, सुनील मोरे, राहुल पवार, रमेश पवार, चंद्रभान बर्डे, संदीप मोरे, बाळासाहेब वाघ आदींनी आ.आशुतोष काळे यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे