कर्मवीरांच्या विचारांवर चालणाऱ्या परिवाराची सून असल्याचा आभिमान वाटतो -सौ.चैतालीताई काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
समाजातील गोर-गरीब कष्टकरी समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडीत घेवून जाणाऱ्या पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांवर ज्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीची वाटचाल सुरु आहे. त्या काळे परिवाराची सून असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या ग.र.औताडे पा.माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सौ.चैतालीताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी त्यांच्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ.चैतालीताई काळे यांनी स्व.ग.र.औताडे पा.यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.पुढे बोलतांना सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की, कर्मवीर भाऊराव पाटील प्रेरणादायी व ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निस्वार्थी व पवित्र शिक्षण प्रसाराच्या कार्याची कर्मवीर शंकररावजी काळे यांनी प्रेरणा घेवून रयत शिक्षण संस्थेच्या विस्तार वाढीत महत्वाची भूमिका बजावून रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांची निर्मिती करून सर्व प्रकारची मदत केली. तो वारसा मा.आ.अशोकराव काळे यांनी अविरतपणे पुढे चालविला व त्यांची तिसरी पिढी अर्थात आ.आशुतोष काळे यांनी देखील हा वारसा जपला असून आजही काळे परिवाराची कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांवर वाटचाल सुरु आहे. रयत शिक्षण संस्थेला आपली मातृ संस्था समजणाऱ्या व कर्मवीरांच्या विचारांवर वाटचाल करणाऱ्या परिवाराची सून असल्याचा अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. उपस्थिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन सचिन रोहमारे, संचालक प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, पद्मविभूषण डॉ.पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, कृषी उत्पन्न बाजर समितीचे संचालक संजय शिंदे, नंदकिशोर औताडे, वाल्मीकराव नवले, विशाल रोहमारे, सचिन औताडे, योगेश औताडे, सौ.इंदुमती औताडे, जयंत रोहमारे, प्रमोद रोहमारे, पोपट शिंदे, तुकाराम जाधव, प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी, प्राचार्य के.डी.शिंदे, प्राचार्य देशमुख, पर्यवेक्षक नेहे आदी मान्यवरांसह पालक पोहेगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.