संजीवनी उद्योग समूह

बांधकाम कामगारांना स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते भांड्याच्या किटचे वाटप

0 5 3 7 5 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या कामगार बांधवांना गृह उपयोगी भांड्याचे किट वाटप स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव तालुका इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या कामगार बांधवांना गृह उपयोगी भांडे किट वाटप करण्यात आले.इमारत बांधकाम कामगार यांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे.कोणताही व्यक्ती लहान किंवा मोठा नसतो तर त्याचे योगदान महत्वाचे असते. कष्ट करणारा वर्ग आणि सामाजिक नीतिमूल्ये जपणारी संघटना म्हणून या संघटनेचे मोठे काम आहे.सेवा आणि माणुसकी जपत कष्ट घेणाऱ्या हातांची कोल्हे परिवाराला जाणीव आहे असे मनोगत यावेळी सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले.कोरोना सारखे संकट असताना बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. कितीही कठीण परिस्थितीत आपल्या कर्तव्यात कसूर न ठेवता काम सुरू असते.शासनाच्या वतीने बांधकाम कामगार यांच्याप्रती सहकार्य भावना जपत त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो.अतिशय मेहनती असणारे बांधकाम कामगार यांची राष्ट्राच्या जडणघडणीत मोठी भूमिका आहे.माणुसकीची भावना ठेवून सर्वांनी एकत्र रहायला हवे.संपूर्ण कुटुंब हे संघर्षमय जीवन जगत असतात.भांडे किट हे घरातील महिला भगिनींना देताना मला विशेष आनंद आहे.देण्यात आलेल्या गृहोपयोगी वस्तूंचा उपयोग महिलांना होईल.बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान वापरून दर्जेदार सुधारणा होत आहे.नावीन्यपूर्ण वास्तू आणि बांधकामे करताना या क्षेत्राचे कलाकौशल्य कौतुकास्पद आहे.विविध प्रकारचे बदल समाजात होत असताना त्यामागील कष्ट घेणाऱ्या हातांची दखल घेतली जावी यासाठी माझे नेहमी सहकार्य असेल.बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न असतात ते सुटण्यासाठी माझा प्रयत्न असेल.या प्रसंगी ज्येष्ठ नेते शरदनाना थोरात,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे,गोपीनाथ गायकवाड,प्रमोद नरोडे,सोमेश कायस्थ,सतीश रानोडे,संस्थापक बांधकाम कामगार संघटना ज्ञानेश्वर रोकडे,अध्यक्ष किसन भाबड,सचिव सुधाकर क्षीरसागर,उपाध्यक्ष सादिक पठाण,सदस्य नंदकुमार मेंगाने बांधकाम कामगार बंधू,भगिनी व मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे