आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

चाळीस वर्षाचा रस्त्याचा वनवास आ.आशुतोष काळेंनी केला दूर

0 5 4 1 0 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

वाकडी,चितळी परिसरावर कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच प्रेम केले. कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांना माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील कोपरगाव मतदार संघाप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील विकासाच्या बाबतीत न्याय दिला. तोच विकासाचा वारसा पुढे चालवितांना वाकडी गावासाठी ४५ कोटीचा निधी दिला आहे. चितळीसाठी पावणे चार कोटी निधी दिला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासातून नागरिकाच्या अडचणी दूर होणार आहे याचे नागरिकांप्रमाणे मला देखील समाधान आहे. परंतु या विकासामुळे चितळी आणि वाकडीच्या नागरिकांचे ऋणानुबंध वृद्धींगत होणार याचा विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी येथे आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या ३ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या चितळी-वाकडी रस्ता डांबरीकरण कामाचे, १० लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिर सुशोभीकरण व १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या मुस्लिम कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणे कामाचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते होते.याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी झालेल्या विकासाबद्दल आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, वाकडी-चितळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाला कोपरगाव मतदार संघाचे भाग्यविधाते आ.आशुतोष काळे यांनी ३ कोटी निधी दिल्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वेड्या बाभळीच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्याला मोकळा श्वास घेता येणार आहे. वाकडीवरून चितळी डीस्टीलरीमध्ये रोजी रोटीसाठी जाणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांनी कित्येक वर्ष या खराब रस्त्याचा त्रास सोसला असून हा त्रास दूर होणार आहे. सहा किलोमीटर रस्त्यावर आजपर्यंत मुरुमाचा खडा देखील पडला नव्हता. त्यामुळे वाकडी आणि चितळीच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने आ.आशुतोष काळे यांनी न्याय दिला. विकासातून हा न्याय देतांना ज्याप्रमाणे मा.आ.अशोकराव काळे यांनी सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून विकास केला तोच कित्ता आ.आशुतोष काळे यांनी गिरवत जवळपास चाळीस वर्षाचा रस्त्याचा वनवास दूर करून बंद झालेला रस्ता पुन्हा सुरु होत आहे. त्याबद्दल वाकडी, चितळी, धनगरवाडी परिसरातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.आ.आशुतोष काळे यांनी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला तसेच नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमा प्रसंगी चितळी येथे बौद्ध विहारासाठी २० लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने व मुस्लिम कब्रस्थान संरक्षक भिंत बांधणेसाठी निधी दिल्याबद्दल मुस्लीम माता भगिनींनी आ.आशुतोष काळे यांचा सत्कार केला.यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, ॲड.अशोक वाघ, भाऊसाहेब शेळके, अनिल कोते, दिपक वाघ, सोपान वाघ, सुरेश वाघ, संपत वाघ, भीमराव कदम, सोनाजी पगारे, रुपेश गायकवाड, तौफिक कुरेशी, इमरान कुरेशी, बाळासाहेब गायकवाड, दिलीप चौधरी, विजय चौधरी, राजेंद्र चौधरी, रामदास वाघ, शैलेश वाघ, सूर्यकांत उदावंत, महेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्या ताराबाई गायकवाड, उपसरपंच कविता पगारे, जयश्री वाघ, संजय वाघ, बाबासाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्या सौ.स्वाती वाघ, गौतम गायकवाड, मेजर गडवे, संदीपानंद लहारे,वाकडी ग्रामपंचायत सदस्य सुनील कुरकुटे, अनिल रकटे, धनगरवाडी ग्रामपंचायत सदस्य योगेश रकटे, साहेबराव आदमाने, प्रभाकर एलम, बाबासाहेब शेळके, निलेश लहारे, महेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रविंद्र चौधरी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, कृषी सहाय्यक राजेश पऱ्हे, ग्रामविकास अधिकारी मधुकर आग्रे, कामगार तलाठी सौ.स्वाती साळवे, पाटबंधारे विभागाचे अविनाश जाधव आदी मान्यवरांसह चितळी, वाकडी व धनगरवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे