कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी 41 इच्छुकांनी 61 अर्ज खरेदी केले असून 1 अर्ज दाखल झाला आहे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 27 इच्छुकांनी 39 अर्ज खरेदी केले तर दुसऱ्या दिवशी 14 इच्छुकांनी 22 अर्ज खरेदी केले असून एकूण 61 अर्जाची विक्री झाली आहे मात्र इच्छुकांमध्ये जरी उत्साह असला तरी मात्र सध्या कोपरगाव शहरासह तालुक्यात कोल्हे परिवाराच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे त्यामध्ये माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विवेक भैय्या कोल्हे हे त्यावेळी उपस्थित होते यावेळी अमित शहा साहेबांनी महायुतीमध्ये कोपरगाव विधानसभेचा निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या स्नेहलता ताई कोल्हे व विवेक भैय्या कोल्हे यांची दखल घेऊन त्यांना सकारात्मक विश्वास दिल्याचे समजते त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याबाबत तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे सध्याच्या घडीला कोपरगाव शहरातील बाजारपेठ दिवाळी सण तोंडावर येऊन देखील शांत आहे तसेच आज बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी देखील दुपारी 3 वाजेपर्यंत 14 इच्छुकांनी 22 अर्ज खरेदी केले असून खरेदी केलेले अर्जा पैकी दुपारी 03 वाजेपर्यंत 01 अर्ज दाखल झाला आहे तो म्हणजे प्रभाकर भाऊजी अहिरे (अपक्ष) त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगत कधी रंगणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.