एसटी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आंदोलन ! त्यामुळे एसटीची चाके थांबण्याची शक्यता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राज्यातील शाळा कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामानिमित्त शहर व तालुक्यातुन येणाऱ्या व जाणाऱ्या एसटी प्रवाशांची उद्या एसटी कामगारांचे आंदोलन असल्यामुळे उद्या एसटी बस सेवा कदाचित बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत आज एसटी कर्मचाऱ्यांनी उद्याच्या आंदोलनाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या चालक वाहकांची मते आजमावून घेऊन वरिष्ठ पातळीवरून आलेले आदेशा बाबत सर्वांना माहिती देऊन उद्याच्या आंदोलनाबाबत यावेळी चर्चा झाली तेव्हा यदाकदाचित एसटीची चाके उद्या थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एसटी कामगारांने संयुक्त कृती समितीच्या वतीने उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एसटी कामगारांच्या समितीने या अगोदर काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांएवढे करावे,ही प्रमुख मागणी केली आहे. त्यामुळे उद्यापासून एसटी कामगार काम बंद ठेवून धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी सेवा बंद झाली तर शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. तेव्हा हि गैरसोय झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहिल असा इशारा एसटीच्या कृती समितीने दिला आहे.