अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ प्रवासी राजा दिनाच्या निमित्ताने कोपरगावकरांच्या समस्या घेणार जाणून

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील एसटी बाबतच्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठ अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ या कोपरगाव आगारातील व कोपरगावकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ०२.०० या वेळामध्ये “प्रवासी राजा दिन” साजरा करून या वेळामध्ये नागरिकांच्या बस बाबत किंवा चालक वाहकांबद्दल विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी समजावून घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने त्या उपाययोजना करणार आहेत तसेच दुपारी ०३.०० ते ०५.०० या वेळामध्ये कामगार पालक दिन साजरा करून परिवहन कर्मचारी व त्यांच्या संघटना यांच्या काही समस्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर चर्चा करणार आहेत त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील प्रवाशांचे काही प्रमाणात का होईना समाधान होण्याची शक्यता आहे प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यास त्यामुळे कदाचित मदत होऊ शकेल त्यामुळे एसटीचे विभाग नियंत्रक व अधिकारी हे प्रवाशांच्या समस्या तक्रारी व काही सूचना असल्यास त्या स्थानिक पातळीवर जलद गतीने त्या गोष्टींचा निपटारा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी बस आगारात दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” अभियान आयोजित करण्यात आला आहे त्यानुसार विभाग नियंत्रक हे कोपरगाव डेपो मध्ये २२ जुलै २०२४ रोजी येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, सूचना व काही तक्रारी याबाबत आपण स्वतः विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या व तक्रारी मांडू शकता आपल्या समस्यांची व तक्रारींची चर्चा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित रहावे.