संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची इटॉनने केली वार्षिक पॅकेज रू ५.५ लाखांवर निवड

0 5 3 8 1 2

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग सतत नामांकित कंपन्यांच्या संपर्कात राहुन आपल्या अभियंत्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल असतो. अशाच प्रयत्नातुन इटॉन कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात संजीवनीच्या पद्मश्री प्रशांत बोळीज व संजना घनशाम चांदर या दोन अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच सुरूवातील वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख देवुन नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे इटॉन या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीला पसंती दिली आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे

संजीवनी पॉलीटेक्निकमध्येच मुलीला प्रवेश मिळावा, ही आमची मनापासुन इच्छा होती कारण येथुनच मुलीला नोकरी मिळणार याची खात्री होती. योगायोगाने येथेच प्रवेश मिळाला आणि आम्ही बिनधास्त झालो. तीनवर्षात एकदाही पॉलीटेक्निकमध्ये येण्याची गरज पडली नाही. सर्व काही शिक्षकांवर सोपविले. मुलीच्या प्रगतीबाबत शिक्षकच आम्हाला माहिती कळवायचे. आज आमच्या खेडेगावातील मुलीला रू साडेपाच लाखांचे पॅकेज मिळाले, यापेक्षा आम्हाला दुसरा मोठा आनंद नाही. खरोखच आपल्या मुलांचे करीअर घडवायचे असेल तर संजीवनी हे शाश्वत ठिकाण आहे, असे आम्ही इतरांना सांगतो. आम्हा पालकांचा विश्वास संजीवनीने सार्थ ठरविला- अभियंता मुलीची आई सौ.कविता चांदर.

की इटॉन ही मुळची अमेरिकन कंपनी असुन ११३ वर्षांपासून एरो स्पेस, इलेक्ट्रिकल पावर सिस्टीम डीझाईन, इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. इटॉनने संपुर्ण महाराष्ट्रातील नामांकित पॉलिटेक्निक प्लेससमेंट ड्राईव्ह घेतला व त्यातुन फक्त फक्त तीन डीप्लोमा अभियंते निवडले. यात संजीवनीच्या पद्मश्रीने व संजनाने टी अँड पी विभागाने तयारी करून घेतल्यामुळे बाजी मारीत रू ५. ५ लाखांचे चालु वर्षाचे उच्चांकी वार्षिक पॅकेज मिळवुन संजीवनी पॉलीटेक्निक ग्रामीण भागात असुन देखिल कोठेही मागे नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. निवड झालेल्या दोनही मुली या कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुली आहेत. विशेष म्हणजे या अभियंता मुलींनी दीड वर्ष सेवेचा कार्यकाल पुर्ण केल्यावर कंपनीच्याच खर्चाने त्यांना देशातील अग्रगण्य इंजिनिअरींग कॉलेजमध्ये इंजिनिअरींगची डीग्री पुर्ण करण्याची संधीही मिळणार आहे.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी दोनही निवड झालेल्या अभियंता मुलींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यंानी या मुलींचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार केला. यावेळी पालक प्रशांत बोळीज, घनशाम चांदर, माधुरी बोळीज , कविता चांदर, प्राचार्य ए. आर. मिरीकर, टी अँड पी प्रमुख प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार व प्रा. साहेबराव दवंगे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे