आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग सेवा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने बदलत्या काळानुसार आपल्या बँकिंग व्यवहारात अमुलाग्र बदल करून संस्थेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे या सेवेचे उद्घाटन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली. यामध्ये कारखाना व परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक यांची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेने यापूर्वीच एन.ई.एफ.टी. व आर.टी.जी.एस. सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोबाईल बँकिंग सुविधा ग्राहकांचे सेवेत रुजू केली आहे.त्यामुळे ग्राहकांना काही अंशी राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत सर्व प्रकारच्या सेवा देण्यासाठी संस्था सज्ज झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.या सेवेमुळे ग्राहकांना घर बसल्या बँकिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे.येत्या काळात संस्था परिपूर्ण डिजिटल बँकिंग सेवा ग्राहकांच्या सोयीसाठी निर्माण करेल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक अनिलराव महाले, सुदामराव वाबळे, व्यंकटेश बारहाते, महेन्द्र काळे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हळनोर, भाऊसाहेब लुटे, तालिब सय्यद, चंद्रशेखर कडवे, भाऊसाहेब माळशिकारे व्यवस्थापक मंगेश देशमुख उपस्थित होते.