आ.आशुतोष काळेंचा वाढदिवस उत्तराखंडात साजरा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आपण संकटात असतांना आपली काळजी करणाऱ्या जीवाभावाच्या नेत्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकत नसलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क उत्तराखंडात आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा करून भगवान बद्रिनाथाच्या चरणी आ.आशुतोष काळेंना मंत्रीपद मिळावे अशी प्रार्थना करून साकडे घातले आहे.कोपरगाव मतदार संघातील आ.आशुतोष काळे यांचे कार्यकर्ते केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेसाठी गेले असून काही दिवसांपूर्वी उत्तराखंड मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून पूल व रस्ते वाहून गेल्यामुळे या कार्यकर्त्यांना केदारनाथाचे दर्शन न घेता माघारी परतावे लागले होते.
दरवर्षी आ. आशुतोष काळे श्री साईबाबांचे दर्शन करून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर उपस्थित असतात. त्याप्रमाणे याहीवर्षी शुभेच्छा स्विकारण्यासाठी सकाळी दहा ते चार यावेळेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी कार्यकर्त्यांची शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.अनेक कार्यकर्त्यांनी केक आणून व पुष्पगुच्छ देवून आ.आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तर यावेळी काही हौशी कार्यकत्यांनी वाढदिवसस्थळी डी.जे. लावून स्वत:ही मनसोक्त नाचत आ.आशुतोष काळे यांना खाद्यावर घेवून नाचत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या इतर कार्यकर्त्यांना देखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही.त्यामुळे डी.जे.च्या तालावर कार्यकर्त्यांनी चांगलाच ताल धरला होता. त्यावेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या विजयी मिरवणुकीची आठवण होवून कार्यकर्त्यांचा हा उत्साह येणाऱ्या विधानभा निवडणुकीतील विजयी मिरवणूकीची रंगीत तालीम असल्याचे निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेल्या वातावरणावरून जाणवत होते.
त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी स्वत: सर्व कार्यकर्ते व त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांची भ्रमनध्वनी वरून संपर्क करून काळजी घेण्याचे सांगितले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रवासात व्यत्यय येवून इच्छा असून देखील निर्धारित वेळेत कोपरगावला न पोहोचू शकल्यामुळे या कार्यकर्त्यांना आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहता येणे शक्य नसल्याने त्या सर्व कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र बद्रीनाथ येथे गरिबांना फळे वाटून आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा केला आहे.
शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते ॲड.युवराज कुऱ्हाडे यांनी आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ३००० कोटी निधीतून मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आ.आशुतोष काळे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून त्यांना मंत्रीपद मिळावे व कोपरगाव मतदार संघाचा अधिकाअधिक विकास व्हावा अशी प्रार्थना भगवान बद्रीनाथ चरणी केली आहे.