रयत संकुलाच्या वतीने कोपरगावात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त चित्ररथाची मिरवणूक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक आणि तांत्रिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्यालय, सी. एम.मेहता माध्यमिक कन्या विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव यांच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त शहरांमध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे उद्घाटन मा. आमदार श्री.आशूतोष काळे अध्यक्ष-उत्तर विभाग, रयत शिक्षण संस्था सातारा, यांच्या शुभहस्ते झाले.या मिरवणुकीमध्ये बिपिनदादा कोल्हे सदस्य-जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा.विवेक कोल्हे सदस्य-महाविद्यालय विकास समिती, पद्माकांत भाऊ कुदळे सदस्य-जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था सातारा आदी मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये लेझीम, चित्ररथ, झांजपथक,आकर्षणाचे बिंदू ठरले. सर्व संकुलातील १२०० विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.सकाळी ७.४५ वा. एम.के.आढाव विद्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते. प्रसंगी “ स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद”, “रयत शिक्षण संस्थेचा विजय असो”, “कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विजय असो” असा कर्मवीरांचा जयजयकार करीत भव्य मिरवणूक कोपरगाव शहरांमध्ये काढण्यात आली होती. बहुजनांना शिक्षणाची दारे खुले खुली करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.या मिरवणुकीचे नियोजन वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.अर्जुन भागवत, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय शिंदे, मुख्याध्यापिका सौ.शेलार प्रमोदिनी, मुख्याध्यापक शहाजी सातव, मुख्याध्यापक सुभाष दरेकर, मुख्याध्यापक नंदकुमार खाडे यांनी केले.सदर मिरवणुकीत सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सुपरवायझर,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.