महाराष्ट्र
कोपरगाव शहरात कोपरगाव स्टेरीओ अँड टि.व्हि सेंटर या दुकानाला आग

0
5
4
1
2
7
संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका समोरील मेन रोडच्या कडेला असलेल्या कोपरगाव स्टेरिओ अँड टि.व्हि या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मालाचे नुकसान झाले आहे या दुकानाचे मालक मनोज पैलवान व राहुल पैलवान यांच्या मालकीचे हे दुकान असून दुकानांत लागलेल्या आगीने व धुराने नागरिकांची एकच धावपळ उडाली मात्र तेथील काही नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.व अग्निशामक दलाची गाडी वेळेत घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
0
5
4
1
2
7