आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

अखेर भगवान वीर एकलव्य पुतळ्याची जागा ठरली आ.आशुतोष काळेंकडून आदिवासी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण

0 5 4 1 1 4

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी अनेक वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील आदिवासी बांधवांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात धारणगाव रोडला भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे.कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असून या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा या मागणीबाबत आ.आशुतोष काळे यांनी त्यांना पुतळा उभारण्याचा शब्द दिला होता.

आ.आशुतोष काळेंनी आमच्या भावना जाणल्या

कोपरगाव मतदार संघात भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा हि आमच्या आदिवासी समाजाची मागील कित्येक वर्षापासूनची मागणी होती परंतु मागील ७० वर्षाच्या काळात आमच्या समाजाचा विचार झाला नाही. परंतु आमच्या भावनांचा विचार करून आ. आशुतोष काळे यांनी आमच्या भावना जाणल्या व आमची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याबाबत तातडीने बैठक घेवून भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा देखील निश्चित केली आहे.त्यामुळे मतदार संघातील संपूर्ण आदिवासी समाज आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी उभी राहील-उत्तमराव पवार (तालुकाध्यक्ष -एकलव्य युवा संघटना )

दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निधीची मागणी देखील केली आहे. त्याबाबत मंगळवार (दि.०८) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्या समवेत आदिवासी बांधवांसह सविस्तर चर्चा करून भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांशी चर्चा करतांना आ.आशुतोष यांनी सांगितले की, मी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस आहे मी खोटी आश्वासने देत नाही आणि देणारही नाही. आदिवासी बांधवांना मी शब्द दिला होता की, मी भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणार. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करून आज पुतळ्यासाठी कोपरगाव शहरात जागा निश्चित करण्यात आली आहे.

तरीदेखील काही व्यक्ती आपला गैरसमज करू शकतात. पण मी माझा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी शासन दरबारी तब्बल एक कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केलेला असून त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या निधीतून आदिवासी समाज बांधवांना अपेक्षित असलेला भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थितीत आदिवासी बांधवानी आदिवासी समाजाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे