Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आ.आशुतोष काळेंच्या दूरदृष्टीतून पश्चिम भागही रस्त्याच्या बाबतीत कायमस्वरूपी होणार समृद्ध-सचिन चांदगुडे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आ.आशुतोष काळे यांनी रस्ते व पुलांच्या कामांसाठी मतदार संघातील रस्त्यांसाठी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये जवळपास सातशे कोटीपेक्षा जास्त निधी आणल्यामुळे बहुतांश रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर झालाच परंतु त्याचबरोबर दळणवळणाला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अशातच अजून एका महत्वाच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे मतदार संघातील इतर भागाबरोबरच कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग देखील रस्त्याच्या बाबतीत लवकरच कायमस्वरूपी समृद्ध होणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.मतदार संघाच्या विकासासाठी निधी कसा मिळवायचा आणि त्यासाठी पाठपुरावा कसा करायचा हे कसब आ.आशुतोष काळे यांनी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये योग्य प्रकारे अवगत करून कधी एका रस्त्याला १९१ कोटी तर दुसऱ्या रस्त्याला २३२ कोटी निधी अथक प्रयत्नातून त्यांनी मिळविला आहे. ज्या रस्त्यांची कामे पूर्ण होतील अशी अपेक्षाच मतदार संघातील जनतेने सोडली होती अशा रस्त्यांसाठी सुद्धा त्यांनी शेकडो कोटी निधी आणला आहे. यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणारा पश्चिम भागातील दक्षिण-उत्तर असलेला राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्याचा समावेश आहे.ज्याप्रमाणे १९१ कोटी निधीतून ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर-कोपरगाव या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याप्रमाणेच २३२ कोटी निधीतून राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.शेजारील गुजरात राज्यातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांसाठी, कोपरगाव तालुक्यासह राहाता, शिर्डी, राहुरी आदी तालुक्यातून वणीच्या सप्तशृंगीगडावर जाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल लासलगाव, बसवंत पिंपळगाव आदी कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवून

जाहिरात
जाहिरात

जाण्यासाठी अशा एक ना अनेक गोष्टींसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या देर्डे फाटा ते भरवस फाटा तालुका हद्द या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या रहदारीवर अवलंबून असणाऱ्या देर्डे चांदवड पासून ते मढी, शहाजापूर, सुरेगाव, वेळापूर, कारवाडी, मंजूर, चासनळी, मोर्वीस, धामोरी आदी गावातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प होवून बसले होते.अनेक वेळा विनवण्या, लेखी अर्ज करूनही या रस्त्याकडे साफ दूर्लक्ष करण्यात आले होते. परंतु २०१९ ला आ.आशुतोष काळे यांनी निवडून येताच प्रतिकूल परिस्थितीत देखील सातत्याने पाठपुरावा करून राज्य मार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यासाठी अगोदर १० कोटी व त्यानंतर या रस्त्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी तब्बल २३२ कोटी निधी आणला असून या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत देर्डे फाटा ते शहाजापूर पर्यंत रस्त्याचे काम योग्य पद्धतीने सुरु असून जून अखेर प्राथमिक स्वरूपाचे काम पूर्ण होईल व त्यानंतर सिमेंट कॉंक्रीटचे मजबूत काम होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दशकापासून त्रास सोसणाऱ्या देर्डे चांदवड, मढी, शहाजापूर, सुरेगाव, वेळापूर, कारवाडी, मंजूर, चासनळी,मोर्वीस,धामोरी आदी गावातील नागरिकांची कायमची अडचण दूर होवून कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग देखील रस्त्याच्या बाबतीत लवकरच कायमस्वरूपी समृद्ध होणार असल्याचे सचिन चांदगुडे यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »