कोपरगाव तालुक्यात ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम सुरु

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जल व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांना त्याची माहिती मिळावी, या उद्देशातून जलसंवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या जलसंपदा विभागाचा ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम मंगळवार (दि.१५) पासून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यात सुरु करण्यात आला आहे.जलसंपदा विभागाच्या वतीने १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात देखील ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार (दि.१५) रोजी तहसीलदार महेश सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा’ कार्यक्रमात नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याची बचत हि काळाची गरज असून त्याबाबतचे महत्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी पाण्याचा योग्य वापर अशा विविध विषयांच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी नियमितपणे पंधरा दिवस विविध उपक्रम राबविले जाणार असून या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी बचतीच्या बाबतीत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.जलसंपदांचा शाश्वत वापर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन हे भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे.

त्यासाठी शासनाच्या पुढाकाराबरोबरच लोक-सहभाग, शाळा-महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असणार आहे. या सर्व महत्वपूर्ण माध्यमांच्या मदतीने राबविण्यात येत असलेले ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ हे एक सकारात्मक पाऊल असून, भविष्यातील जलसुरक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी हे एक प्रेरणादायी टप्पा ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उपविभागीय अभियंता संदीप पाटील, गोदावरी दूध संघाचे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, माजी सदस्य मधुकर टेके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक सुधाकर रोहम, दिलीपराव बोरणारे, अनिल कदम, प्रशांत घुले, विष्णु शिंदे, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवण, पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, संचालक रावसाहेब चौधरी, वीरेंद्र शिंदे, दिलीपराव शिंदे, संचालक बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाण, संभाजीराव काळे, आदी मान्यवरांसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.