कोपरगाव विधानसभेची मतमोजणी उद्या १९ फेरीत होणार तर २ लाख ७ हजार ७७ मतदारांनी बजावला हक्क

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदार संघात गतवेळेपेक्षा यंदा कमी मतदान झाले आहे गुरुवारी अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघात ७६.२३% मतदान झाले होते तर नुकत्याच झालेल्या विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत ७१.३१% टक्के मतदानाची नोंद झाली आहे निवडणूक आयोगाने निश्चित केलेली मतमोजणी यावर्षी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल लक्ष्मीनगर या ठिकाणी मतमोजणी होणार आहे यामध्ये २० टेबलावर १९ फेऱ्या होणार आहे या निवडणुकीमध्ये पोस्टल मतदान १७०० इतके झाले असून १२ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे विशेष म्हणजे यंदा नव मतदार ३४३३ नी वाढले आहे ही एक सकारात्मक बाब आहे तसेच मागील वेळी ७६.२३% मतदान झाले होते मात्र या निवडणुकीत त्यामध्ये घट होऊन ७१.३१% मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले या निवडणुकीमध्ये मतदारांना लागलेली उत्सुकता म्हणजे मतदान केव्हा होणार ? निकाल केव्हा लागणार ? मतमोजणी शनिवारी सकाळी ०८.०० वाजता सुरू होणार आहे यावेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचे कुलूप उघडले जाते यावेळी निवडणूक आयोगाची निवडणूक अधिकारी आणि विशेष निरीक्षकही यावेळी उपस्थित असतात त्यानंतर ईव्हीएम चे कंट्रोल युनिट मतमोजणी टेबलावर आणली जाते टेबलावर ठेवल्यानंतर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील जुळतात प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटलाही ते दाखवले जाते त्यानंतर कंट्रोल युनिट मधील बटन दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचे मत त्यांच्या नावापुढे ईव्हीएम मध्ये दिसून येते अशा प्रकारे मतमोजणीच्या १९ फेऱ्या यावेळी होणार आहे त्यानंतर निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करतील याबाबत कोपरगावचे आमदार कोण होईल याचे चित्र स्पष्ट होण्यास काही तास उरले आहेत तोपर्यंत गावागावांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे कोणाला किती मताधिक्य मिळणार, तुमच्या गावांमध्ये जास्त मतदान कोणाला झाली, असे अंदाज बांधले जात आहेत तर काही गावांमध्ये अनेकांच्या पैजा देखील लागल्या आहेत काहीजण एक्झिट पोलचे दाखले देत सरकार कोणाचे होईल याचे आडाखे कोपरगाव शहरासह तालुक्यात बांधले जात आहे.मतमोजनीची तयारी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये पूर्ण झाली आहे.