उत्कर्षा रुपवते

वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यावर अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे रात्री भ्याड हल्ला

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या प्रचारा दरम्यान सोमवार दिनांक ०६ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे प्रचार दौऱ्यानिमित्त मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेल्या असतांना व तो दौरा आटपून रात्री १२ वाजेच्या दरम्यान संगमनेर कडे परतत असतांना चितळवेढे येथे दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या इनोव्हा गाडीवर जोराची दगडफेक केली या दगडफेकी मध्ये इनोव्हा गाडीची समोरील काच फुटल्याने व त्या काचा उत्कर्षा रूपवते यांच्या अंगावर पडल्या मात्र उत्कर्षा रूपवते यांना कुठलीही दुखापत झालेली नाही त्यामधून त्या सुखरूप बचावल्या आहेत मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत अकोला पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची माहिती देताच अकोला पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घडलेल्या घटनेची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली आहे खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदाच असा एका महिला उमेदवारावर भ्याड हल्ला झाल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून याबाबत कोपरगाव तालुका भारतीय बौध्द महासभा संलग्न नालंदा बुद्ध विहार कमिटीचे पदाधिकारी शांताराम रणशूर, रमेश गवळी, रत्नाकर गायकवाड, दादासाहेब साबळे, बाबासाहेब जमधडे, खिवराज दुशिंग, सुभाष रणधीर, बिपीन गायकवाड यांच्यासह इतरही संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काल रात्री घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे