खडकी येथील आगीच्या दुर्घटनेचा पंचनामा करून शासनाकडून मदत मिळवून द्या आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील उपनगरातील खडकी येथे गुरुवार दि.२ मे २०२४ रोजी दुपारी २.०० च्या सुमारास झालेल्या आगीच्या घटनेच्य पंचनामा करून त्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.कोपरगाव शहरातील खडकी येथील रहिवासी असणारे गणेश शिरसाठ यांच्या घराला गुरुवार दि.२ मे २०२४ रोजी लागलेल्या भिषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागली होती

की, शिरसाठ यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू बरोबरच दूरदर्शनसंचासह त्यांची दुचाकी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झालेली आहे. शिरसाठ कुटुंब घरी नसतांना हि आगीची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे या कुटुंबापुढे मोठा अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे.सदरच्या घटनेची माहिती आ.आशुतोष काळे यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदरच्या घटनेचा तात्काळ पंचनामे करून शिरसाठ यांच्या कुटुंबाला मदत पुनर्वसन विभाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई लवकरात लवकर करावी याकरीता तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.