कोळपेवाडी दूर क्षेत्र परिसरातून गुरुवारी पोलिसांसह बीएसएफ जवानांचे सशस्त्र संचलन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळपेवाडी पोस्ट दुर क्षेत्र हद्दीमध्ये आज गुरुवार दिनांक २ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास कोळपेवाडी शहरातील शनी चौक येथून सदरचा रूट मार्च निघून कोळपेवाडी मोतीनगर सुरेगाव हद्दीतून पुन्हा कोळपेवाडी दूरक्षेत्र येथे येऊन सांगता करण्यात आली यावेळी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई येथून आलेले बीएसएफ जवानांचे सशस्त्र संचलन संपन्न झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक २ मे २०२४ रोजी दुपारच्या सुमारास कोळपेवाडी दुरक्षेत्र येथे शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
कोळपेवाडी दूर क्षेत्र हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप कोळी यांच्यासह पोलिस अंमलदार व बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे कमांडर अखिलेश कुमार गुप्ता यांच्यासह ३७ जवानांनी कोळपेवाडी दुरक्षेत्र हद्दी मधून कोळपेवाडी गावासह सुरेगाव गावातून शनि चौकावळील पोलीस दुर क्षेत्र या ठिकाणी येऊन संचलनाची सांगता झाली तसेच वरिल सर्वच संवेदनशील भागातून सशस्त्र संचलन पार पडले.