संदीप मिटके यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्र सरकारने दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दहशतवाद विरोधी कारवाई व गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुरक्षा विभागांसह पोलीस, सीआरपीएफ, सीबीआय, आयबी, आयटीबीपीएफ, एनसीबी, एनआयए तसेच पोलीस महानिरीक्षक यांच्यापासून ते अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक केंद्र सरकारने जाहीर केले आहे यामध्ये उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण केल्याने नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांना हा बहुमान मिळाला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर शहर, आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर शहर, शिर्डी शहर, शेवगाव आदी ठिकाणी अनेक गुंतागुंतीचे तपास डिटेक्ट करून कामाचा एक वेगळा ठसा उमटवला होता तसेच शेवगाव येथील दंगल अतिशय कौशल्याने हाताळून त्यातील आरोपी जेरबंद केले होते तसेच शिर्डी शहरातील वेश्या व्यवसायाची मुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे तसेच त्यांच्या कामाचा आलेख चढताच आहे त्यांना यापूर्वी पोलीस महासंचालकांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते तसेच कोरोना कालावधीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेऊन अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे तसेच श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे त्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकारी व पोलिसांच्या वतीने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.