संजीवनी उद्योग समूह

अतिक्रमण विषयावर कोपरगाव पालिकेने संवेदनशील भूमिका ठेवावी – दत्ता काले

0 5 4 1 3 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहरात अतिक्रमण कारवाई मोठ्या वेगाने केली गेली.अद्यापही अनेक भागात उपनगरात कारवाई होण्याची चर्चा सुरू आहे मात्र यापूर्वी देखील बिपीनदादा कोल्हे यांनी भूमिका मांडली होती नागरिकांना त्रास होईल आणि बेघर होईल कुणी असे पाऊल पालिकेने टाकू नये.अनेकांचे मुख्य रस्त्यांच्या कडेला असणारे व्यवसाय कारवाई नंतर बंद झालेले आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपनगरात झोपडपट्टी भागात असणारे निवारे हिरावले जाणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाने घेणे आवश्यक आहे कारण घर उजाडून झालेला विकास कधीही शहराचे झालेले नुकसान भरून काढू शकत नाही हे यापूर्वीचे अनुभव आहे अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी व्यक्त केली आहे.कोपरगाव शहराचा बहुतेक भाग हा उपनगरांनी व्यापलेला असून त्या भागात अनेक उपरस्ते आहेत.पालिका प्रशासनाने गटारीवरील आणि त्या परिसरातील रस्त्यांच्या कडेला असणारे अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्या आहेत आणि त्या बद्दल येणार काळात ते भुमिका घेणार आहे मात्र कुठेलेही पाऊल अतिघाईने न उचलता जनतेला सौम्य भूमिका ठेवत विकासकामे करता येतात अशी अनेक शहरातील उदाहरणे आहेत तसा मार्ग निवडणे गरजेचे आहे.सर्वच प्रश्न टोकाची कारवाई करून सुटणार नाही याची जाणीव नियमांवर बोट ठेवणाऱ्या सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन विविध कामे करता येतात मात्र त्यासाठी केवळ कारवाई हा उपाय नाही.शासनाने मंजूर केलेली स्वच्छतागृहे ही पालिकेच्या मोजपट्टीत येत आहेत ते पाडून रस्ते आणि गटारी आवश्यक नसेल तिथे रुंदविणे हा शासनाच्या पैशाचा अपव्यय ठरेल.

जाहिरात
जाहिरात

नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे त्या दृष्टीने पालिकेने सन उत्सवाच्या काळात व विद्यार्थांच्या परीक्षा सुरू असल्याने नागरिकांना टोकाची कारवाई न करता दिलासा देण्याचा विचार करावा.पिण्याचे पाणी रोज नियमित मिळत नसल्यानेच उन्हाळा दिवसात पिण्यासाठी पाण्याची साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्या असतात त्या गरज म्हणून आहे अडथळा म्हणून नाही याचीही जाणीव प्रशासनाने ठेवायला हवी.मुळातच नागरिकांनी उपनगरातील अनेक भागात रस्त्यांवर आणि गटारीवर असलेल्या पाण्याच्या टाक्या, पाणी निचरा होणारे ड्रेनेज काढून घेतले आहेत त्यामुळे शहराची जनभावना पालिकेने लक्षात घ्यावी. अतिक्रमण कारवाईला विरोध कुणाचा नव्हता मात्र आवश्यक नसेल आणि रहदारीला अडथळा नसेल तरीही कारवाई होणे यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मागील दोन वर्षापूर्वी शहरात अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर स्व.कोल्हे साहेबांच्या निधनानंतर तेराव्याचा विधी पूर्ण करून स्वतः या प्रश्नावर बैठक घेऊन तोडगा सुचविला होता त्या सर्व सूचना प्रशासनाने वेळीच अवलंब केला असता तर प्रश्न वाढला नसता.शिवाय व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध केल्या तर लघु पथकर विक्रेते देखील बेरोजगार होण्यापासून वाचवता येणे शक्य आहे हे पालिका प्रशासनाने लक्षात घेण्याची गरज आहे. शहर प्रगतीला अतिक्रमण कारवाई परवडणारी नाही कारण यात अनेक गरीब नागरिकांचे नुकसान होते असेही शेवटी काले म्हणाले आहेत. शहरातील उपनगरात झालेल्या शासकीय अनुदानातील स्वच्छतागृहांची कामे, पूर्वीच्या गटारी, पाण्याच्या पाइपलाइन,शहरातील पेव्हर ब्लॉकची कामे ही शासकीय निधीतील आहे त्यांचे नुकसान या कारवाईत होऊन पर्यायाने शासनाचे पैशाचे नुकसान यामुळे कृपया आगामी काळात या विषयावर संवेदनशीलता ठेवावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे