एम के आढाव माध्यमिक विद्यालयाची खुशी सुनील शिंदे हिने ७४.२० टक्के गुण मिळवत मारली बाजी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील एम के आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयातील विद्यार्थिनी खुशी सुनील शिंदे हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ७४.२०% गुण पटकावत विशेष यश संपादन केले आहे खुशी शिंदे हिची घरची परिस्थिती बेताची असल्याने खुशीने या सर्व परिस्थितीवर मात करत रात्रंदिवस अभ्यास केला त्यामध्ये गणित व विज्ञान या विषयांमध्ये खत्री मॅडम व शाळेतील सर्व विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे तसेच घरामध्ये आजी आई यांनी वेळोवेळी मला मदत केल्यामुळे मी आज हे यश संपादन करू शकले तसेच मी नियमित अभ्यास केला मोबाईल पासून काही काळ मी दूर राहिले आई-वडिलांचे कष्ट नेहमी डोळ्यासमोर ठेवले तर आजी व आई वडिलांसह माझ्या परिवाराचा खंबीर आधार मला मिळाला त्यामुळे जिद्द चिकाटी व अभ्यासातील सातत्य या बळावर मी दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकले यापुढे देखील आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन माझ्या आई वडिलांचे नाव उज्वल करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी खुशी शिंदे यावेळी म्हणाली याप्रसंगी नालंदा बुध्द विहाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच माजी मुख्याध्यापक रत्नाकर गायकवाड (गुरुजी) तसेच संजय रणशूर बाळासाहेब सोनवणे नानाभाऊ गवळी यांनी खुशीने दहावीला ७४.२०% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल खुशी शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.