ईशान संदिप कोयटे यांने राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेत केली यशस्वी कामगिरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० वी महाराष्ट्र बाल नाट्य स्पर्धेच्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभ नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात २३ जुलै २०२४ रोजी पार पडला. या समारंभात समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ईशान स्वाती संदीप कोयटे याने केलेल्या उत्कृष्ट अभिनया बद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी सुद्धा तालुका व जिल्हा स्तरावर आयोजित बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिके मिळविलेली आहेत.तसेच नुकतीच संपन्न झालेली २० वी महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेत अहमदनगर व नाशिक विभागातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने प्राथमिक फेरीमध्ये धनंजय सरदेशपांडे लिखित व किरण लद्दे दिग्दर्शित ‘एलियन्स द ग्रेट’ या बाल नाट्याचे दर्जेदार सादरीकरण केले होते. सदर बाल नाट्यात ईशान स्वाती संदीप कोयटे याने ‘गुडमा कायलो’ ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. विभागीय पारितोषिक वितरण समारंभ राज्यातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.यामध्ये ईशान स्वाती संदीप कोयटेच्या या यशाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.