संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या चार अभियंत्यांची बुहलर शेरलर कंपनीमध्ये नोकऱ्यांसाठी निवड

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने दरवर्षी अनेक अभियंत्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन दिल्या जातात. अशाच प्रयत्नांमधुन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षाच्या चार अभियंत्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत बुहलर शेरलर या बेंगलोर येथिल कंपनीने आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच कंपनीने नोकरीच पत्र दिले आहे, अशा पध्दतीने संजीवनीच्या परंपरेनुसार दमदार वाटचाल सुरू असल्याची माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.पत्रकात पुढे म्हटले आहे की बुहलर शेरलर ही विद्युत अभियांत्रिकी मधिल कंपनी असुन ऑटोमेशन क्षेत्रात या कंपनीचे कार्य चालते. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. यामुळे कंपनीच्या कसोटीत संजीवनीचे अभियंते सहजपणे उतरले आणि कंपनीने अभिजीत रामदास कोपरे, हर्षद शिवाजी शिंदे , श्रेयश अशोक वडणे आणि रोहीत राजाराम ताकपेरे यांची निवड केली. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असुन त्यांना नोकरी मिळाल्याने ते कुटूंबाचा आधार होणार आहे.

असे दरवर्षी ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्वावलंबी होत असुन यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. दिपेश परदेशी व डीन टी अँड पी डॉ.विशाल तिडके उपस्थित होते.