संजीवनी उद्योग समूह

आ.काळे यांचा हजारो कोटींचा गजर गाड्याचा आणि निवद शेंगोळ्याचा – शेतकरी प्रभाकर भाकरे

0 5 4 1 3 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कान्हेगाव आणि वारी परिसरात विजेची समस्या अतिशय बिकट झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण कार्यालयाचा राजकीय हस्तक्षेपाने सोयीने वापर चालू आहे. प्रत्यक्षात आमदार काळे यांनी कोणतेही ठोस काम वीज प्रश्नाबाबत केलेले नसून केवळ श्रेयवादाच्या राजकारणात त्यांनी सर्वसामान्य जनता भरडवली आहे. काम कमी आणि बोर्ड जास्त असा कारभार चालू आहे.तीन हजार कोटी कुठ गेले कुणालाच दिसत नाहीत याला आमच्या शेतकरी भाषेत याला गजर गाड्याचा आणि निवद शेंगोळ्याचा म्हणतात अशी खरपूस प्रतिक्रिया देत प्रभाकर भाकरे यांनी आमदार काळे यांना खडे बोल सुनावले आहे. कान्हेगाव आणि वारी परिसरात नवीन डीपी देतो असे सांगून वारंवार काळे यांच्या वतीने खोटी आश्वासन दिली गेली. त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे जनतेला काम झाले आहे असे वेड्यात काढण्याचे प्रकार समोर आले. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना विजेची समस्या न मिटल्याने संताप अनावर होतो आहे. काळे गटाच्या कित्येक कार्यकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो आहे. प्रसिद्धीसाठी हुशारकी गाजवणाऱ्या त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. शेतकरी पाण्याचे नियोजन नीट करू शकत नाही तर विद्यार्थी अभ्यास करताना त्रास सहन करतात ही स्थिती आहे.पाच वर्षात नवीन ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्या स्थलांतर करण्यासाठी कोट्यावधीच्या वल्गना करण्यात आल्या.प्रत्यक्षात मात्र प्रश्न जैसे थे आहेत. आश्वासनांच्या भूलथापावरती पाच वर्ष काढून घेतली गेली व आगामी काळात देखील खुशमस्करी करणाऱ्या ठराविक लोकांना हाताशी धरून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे पाप आमदार काळे यांनी केले आहे. आमदार निष्क्रिय आहेत त्यामुळे फक्त राजकीय स्वार्थ तिथे भाष्य अशी त्यांची पद्धत आहेत.यामुळे नागरीकांना त्रास होत असल्याने महावितरण कार्यालयाने कान्हेगाव आणि परिसरातील वीज प्रश्न तातडीने सोडवला नाही तर आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे प्रगतिशील शेतकरी प्रभाकर भाकरे यांनी पत्रक काढून स्पष्ट केले आहे.सामान्य जनतेला फसवणूक करणारे वीस प्रश्न सुटल्याचे संदेश आमदार काळे यांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सामाजिक माध्यमांवर टाकले होते. वास्तविक पाहता ती कामे झालेली नसून जनतेला वेड्यात काढण्याचे काम सातत्याने कसे सुरु आहे याचा पर्दाफाश झाला आहे.जनतेला वेड्यात काढून आपला राजकीय स्वार्थ साधने हे काळे यांना चांगलेच अंगलट येणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे