आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

डाऊच खु.चे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ सर्व सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत

0 5 4 7 5 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील विकासाच्या दिशेने शीघ्र गतीने वाटचाल करीत असलेल्या डाऊच खु.चे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ यांनी नुकताच आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी सरपंच संजय गुरसळ व त्यांच्या सहकारी सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.डाऊच खु.चे लोकनियुक्त सरपंच संजय गुरसळ दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी सरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असतांना डाऊच खु. गावचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास केला आहे. तसेच गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून आवश्यक असलेला निधी आ.आशुतोष काळे यांनी देखील सढळ हाताने दिला आहे.जवळपास तीन कोटी निधीतून डाऊच खु.गावातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी विकास, सर्वधर्मियांच्या भावनांचा विचार करून स्मशानभूमी व कब्रस्तान विकास आदी विकास कामे झाली आहेत. पुढील विकासकामांचे कोट्यावधी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्या विकास कामांना देखील आ. आशुतोष काळे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.

पहिल्या पंचवार्षिकमध्ये डाऊच खु.गावच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या तीन कोटी निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झालेली आहेत.वास्तविक पाहता ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आणि मी वेगळ्या पक्षाच्या विचारांचा परंतु डाऊच खु.गावाच्या विकासाला निधी देतांना त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही हा त्यांचा स्वभाव मला विशेष भावला. तसेच त्यांनी मागील पंचवार्षिक मध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डाऊच खु.येथील श्री महादेव मंदिर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. सरपंचपद हे जरी राजकीय स्वरूपाचे असले तरी आजवर सरपंचपदाच्या माध्यमातून नेहमीच समाजकारण आणि गावाचा विकास एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. आ.आशुतोष काळे यांनी देखील मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत नेहमीच पक्षीय राजकारण बाजूला ठेवले आहे. जनतेच्या प्रश्नाची सखोल जाणीव व ते प्रश्न सोडविण्याची धमक असणाऱ्या नेत्याची साथ देवून डाऊच खु.गावाचा यापेक्षा अधिकचा विकास सहजपणे साधता येवू शकतो या उद्देशातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.-सरपंच संजय गुरसळ.

त्यामुळे यापुढील काळातही डाऊच खु.गावाचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी त्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी सरपंच संजय गुरसळ यांच्या बरोबरच भैय्यासाहेब सय्यद, देविदास पवार, प्रवीण गुरसळ, चंद्रकांत गुरसळ, सुनील गुरसळ, वेनुनाथ पवार, संजय गुरसळ, सर्जेराव गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, माणिक चव्हाण, मोहनराव गुरसळ, बाबासाहेब गुरसळ, अर्जुन होन, देविदास गुरसळ, चंद्रकांत गुरसळ, राहुल बढे, गणेश बढे, बाबासाहेब बढे, सखाराम बढे, बिरू बढे, किरण गुरसळ, भास्कर गुरसळ, मुन्ना सय्यद, जावेद पठाण, शाहरुख शेख, मेहबूब सय्यद, हैखर बेग, चांदभाई सय्यद, मोहम्मद सय्यद, अलीम पठाण, असलम सय्यद, किशोर औटी, मुस्ताक सय्यद, अतुल गुरसळ, शैलेश पवार आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण व चांदेकसारे गटातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आ.आशुतोष काळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवणारे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
16:50