कोपरगाव मतदार संघाच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना मंजुरी – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघाच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाची वीज रोहीत्रांची मागणी पूर्ण करण्यात यश मिळाले असून स्थानिक विकास निधी अंतर्गत २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना तसेच वीज वाहिन्या स्थलांतरीत करणे व नवीन पोल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. त्यामुळे वीज रोहीत्रांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील जुना गावठाण डीपी, पोहेगाव येथील पाटील मळा डीपी, बक्तरपूर येथील गावठाण उगले डीपी, मौजे भोजडे येथील मंचरे डीपी, मढी बु.येथील खळगा डीपी, मुर्शतपूर येथील म्हसोबा नगर एच टी व एल टी वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, वारी येथील रामेश्वर विद्यालय येथील डीपी स्थलांतरीत करणे, कडू कानडे वस्ती येथे पाच ते सहा नवीन पोल टाकणे तसेच वारी येथील सोमय्या डीपी,

सोनेवाडी येथील लांडबळे डीपी, टाकळी येथील आव्हाड डीपी, देर्डे चांदवड येथील प्रितम मेहेत्रे डीपी, धोत्रे येथील डीपी, वेळापूर येथील बिरोबा डीपी, तसेच मंडलिक डीपी, करंजी येथील माऊलाई येथील डीपी, कसली येथील भंडारी डीपी, कोकमठाण कारवाडी येथील रोहोम डीपी, खिर्डी गणेश येथील वसंत लोखंडे डीपी, चांदगव्हाण येथे सानप डीपी, धामोरी येथील गलांडे डीपी, मायगाव देवी येथील गावठाण डीपी, माहेगाव देशमुख येथील काळे डीपी, तसेच चिकू बाग डीपी, संवत्सर येथील गायकवाड डीपी, तसेच रामवाडी-भीमवाडी येथे चार ते पाच पोल टाकणे व दशरथवाडी येथील डीपी, सडे येथील देठे डीपी, हिंगणी येथील म्हसोबा मंदिर डीपी, अंचलगाव येथे एनडाइत शेख वस्ती डीपी, धामोरी येथील कुऱ्हाडे डीपी, शहाजापूर येथील शिंदे डीपी, येसगाव येथील बशीरभाई नाटेगाव रोड डीपी तसेच कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कवठे डीपी, नपावाडी येथील निर्मळ डीपी, जळगाव येथील लोहोकरे डीपी, चितळी येथील दीपक वाघ डीपीसह ५ पोल टाकणे, धनगरवाडी येथील सरपंच डीपीसह ५ पोल टाकणे, रामपूरवाडी येथील थोरात डीपीसह ४ पोल टाकणे, तसेच गमे डीपीसह ७ पोल नवीन टाकणे आदी ठिकाणी नवीन डीपी बसविण्यात येणार आहे.कोपरगाव मतदार संघाला रस्ते, पाणी आणि वीज या मुलभूत विकासाच्या बाबतीत मजबूत करण्यावर आ. आशुतोष काळे यांचा भर आहे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये रस्ते व पाण्याच्या प्रश्नाबरोबरच विजेचे देखील बहुतांश प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी मार्गी लावले आहेत. यामध्ये नवीन सबस्टेशनची निर्मिती तसेच सबस्टेशनची क्षमतावाढ हे प्रश्न सुटले आहेत.कोपरगाव मतदार संघातील चासनळी, सुरेगाव, पोहेगाव हे सबस्टेशन शहा येथील १३२ के.व्ही.उपकेंद्राला जोडली जाणार आहेत.

त्यामुळे कोपरगाव सबस्टेशनवर येणारा भार कमी होणार आहे. तसेच आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील दहा गावांसाठी नुकतीच सौर उर्जा सबस्टेशनला मंजुरी मिळविली आहे व २.६८ कोटी निधीतून उभारले जाणारे नवीन वीज रोहित्र व विविध कामे त्यामुळे येत्या काळात कोपरगाव मतदार संघातील विजेच्या समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार असून शेतकरी, व्यावसायिक व घरगुती वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव मतदार संघातील वीज रोहित्र बसविणे व उर्जा विभागाच्या विविध कामांसाठी २.६८ कोटी निधी दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचे आभार मानले आहे.