सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (दि.३० व ३१ऑगस्ट) रोजी राष्ट्रीय सेवा योजना, मराठी, इतिहास, भूगोल, व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या करिअरची निवड योग्य पद्धतीने करावी असे आवाहन साई निर्माण अकॅडमी शिर्डी चे संचालक प्रमोद कदम यांनी केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ होत्या. दोन दिवसाच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैदानी चाचणीचे मार्गदर्शन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र विद्यार्थ्यांना या कार्यशाळेमध्ये मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भाऊसाहेब कांबळे यांनी केले स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रा.विशाल पोटे यांनी केले तर प्रा. विनोद मैंद यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.