विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्रीय निवडणूक पथक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची परिस्थिती व आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले असून यामध्ये निवडणूक विभागाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह 14 अधिकाऱ्यांचे पथक मुंबई दाखल झाले असून आज सकाळी 10 वाजेपासून विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी सोबत सध्या चर्चा सुरू आहे त्यानंतर दुपारी 01 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच नोडल ऑफिसर यांची बैठक घेणार असून त्यानंतर दुपारी 03 वाजता राज्यातील गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणार असून त्यानंतर सायंकाळी 05 वाजता राज्याचे मुख्य सचिव राज्याचे पोलीस महानिरीक्षक व प्रशासकीय विभागाचे विविध विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा जाणून घेणार आहेत तसेच उद्या शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व राज्यातील पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त यांच्या सोबत बैठक घेऊन प्रशासनाची निवडणुकी बाबत प्रशासकीय तयारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दुपारनंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणुकी बाबत काय तो निर्णय जाहीर करणार आहेत तेव्हा राजकीय नेते व कार्यकर्त्यांची निवडणुकीबाबत लागून राहिलेली उत्सुकता लवकरच संपेल व यानंतर आप आपल्या भागामध्ये निवडणूकीचा जोर वाढेल व उमेदवार व कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये कामाला लागतील असे एकंदरीत चित्र सध्या समोर आहे.