मधुकर वक्ते जेऊर कुंभारी

धावपळीच्या युगामध्ये मैदानी खेळ महत्त्वाचे-सुधाकर वक्ते

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

खऱ्या अर्थाने आजच्या ह्या धावपळीच्या युगात वैयक्तिक जबाबदाऱ्या व मोबाईलचा अती वापर यामुळे तरुणाईला व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशातच मैदानी खेळातुन होणाऱ्या कसरतीमुळे व्यायामाची गरज भरून निघतेच तसेच मानसिक स्वास्थ देखील आबादीत राहते. सांघिक खेळामुळे संघटनात्मक कौशल्याचा देखील विकास होतो.अशा प्रकारच्या खेळामुळे तरूणाई एकत्र येत असून खेळ भावना वाढीस लागते असे प्रतिपादन शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक भाजपा युवा मोर्चा कोपरगाव तालुका अध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केले.ते पुढे म्हणाले की मोबाईलचा अतिवापर आणि अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागांमध्ये खेळासाठी नवीन तरुण पिढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी तशा प्रकारचे ग्राउंड तरुण पिढीला उपलब्ध होत नाहीत ही बाब गंभीर आहे. सांघिक खेळाच्या माध्यमातून तरुण मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असून एकीची भावना दृढ होत जाते त्यामुळे अशा प्रकारच्या मैदानी खेळांची जोपासना करणे आजच्या काळामध्ये एक गरज बनली आहे.कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील श्रीमंत मारूती मंदिर या ठिकाणी रोज आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सर्व खेळाडू संध्याकाळी हाॅलीबॉल हा खेळ खेळण्यासाठी एकत्र जमतात ग्रामीण भागात तरूणांना मैदानी खेळातुन आपले ध्येय साध्य करता येऊ शकतो तसेच खेळातुन शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारना होते या मैदानी हाॅलीबॉल खेळात संजय कारभारी गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड,अजय गुरसळ, शरद चव्हाण,किरण गुरसळ विशाल गुरसळ,संदीपराऊत संदीप वक्ते, अभिजीत गुरसळ,सौरव पवार,सौरव गुरसळ,ऋषी गुरसळ, अक्षय गुरसळ, विकी जगताप,अथर्व गिरमे, सागर गुरसळ,अक्षय चव्हाण, बंटी मेहेत्रे, कैलास जोर्वे,बलविर गरूड,पप्पु वक्ते, यश चव्हाण,लाला गांगुर्डे, ऋषिकेश मेहेत्रे,आदींनी खेळामध्ये सहभाग नोंदवला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे