संजीवनी उद्योग समूह

जनतेच्या मनातला हक्काचा नेता विवेकभैय्या कोल्हे पोहेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काळे गटातुन कोल्हे गटात प्रवेश

0 5 3 7 6 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

युवा नेते विवेकभैय्या कोल्हे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रभावीत होऊन विकासाच्या दूरदृष्टीला साथ देत आज पोहेगांव येथील अनेक कार्येकर्त्यांनी काळे गटाला सोडचिठ्ठी देऊन कोल्हे गटात जाहीर प्रवेश केला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जनतेच्या मनातला हक्काचा नेता आम्हाला विवेकभैय्या कोल्हे यांच्या रूपाने मिळाला अशी बोलकी प्रतिक्रिया नूतन प्रवेश करणाऱ्या सर्वांनी व्यक्त केली. आशुतोष काळे यांच्या फसव्या हजारो कोटींच्या वल्गना असून त्याचे ताजे उदाहरण पोहेगाव रांजणगाव रस्त्याची दहा कोटींची चाळण झाली आहे.याचा अर्थ भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात सुरू असून जनतेच्या हक्काच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.दुसरीकडे कोल्हे कुटुंबाचे सत्ता नसताना देखील शेकडो विधायक कामे सुरू आहे.हजारो तरुणांना रोजगार देण्याचे काम विवेक कोल्हे करणार असल्याने येणारा आम्ही भक्कम नेत्याच्या पाठीशी जाणार असल्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे स्वागत केले.विरोधी गटाने जो भ्रमनिरास जनतेचा खोटी जाहिरातबाजी करून केला आहे तो निश्चितच चुकीचा आहे.हजारो कोटी आले तर ते गेले कुठे प्रश्न आपण सर्वच व्यक्त करता आहेत तर त्यात तथ्य आहेच असे अधोरेखित केले.कोल्हे कुटुंबाने रोजगार प्रश्नावर काम केले आहे आणि तेच काम व्यापक स्वरूपात अधिक मोठे उभे करावे हे माझे प्रयत्न आहेत. सोनेवाडी शिवारात एम आय डी सी येण्यासाठी आपले प्रयत्न अनेक वर्षापासून होते त्याला यश मिळाले आहे.श्रेय घेण्यासाठी कुणी धडपड करत असेल तर त्यांना डोळे उघडतील असे पाठपुरावा असणारे कागदपत्र आपल्याकडे आहेत.याउलट विरोधकांनी रोजगार तर आणला नाहीच पण दळणवळण दुरावस्था केली आहे.पोहेगाव रस्त्याची केलेली दुर्दशा जशी आहे तशीच संपूर्ण मतदारसंघाची अवस्था आहे याकडे कोल्हे यांनी लक्ष वेधले.कोल्हे गटात प्रवेश करणारे पोहेगाव येथिल युसीफ विश्वनाथ भालेराव, सागर दिनकर भालेराव, शिलाबाई नामदेव सोनवणे, कुणाल नरेंद्र भालेराव, विशाल सुनील भालेराव, गोरख विश्वनाथ भालेराव, दिनकर पावलास भालेराव, राजेंद्र मनोहर भालेराव, सुनिता राजेंद्र भालेराव, आकाश भालेराव, अजय भालेराव, कृष्णा भालेराव, सिद्धार्थ भालेराव, गौरव तपासे, अंकित निकम, साई भालेराव, अनिल भालेराव, अफसर शेख, अविनाश भालेराव, विनायक तपासे, नामदेव सोनवणे, केशव खरात, बाबासाहेब भालेराव, साहिल भालेराव यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केला.
यावेळी बोलतांना विवेक कोल्हे म्हणाले कि,आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण करतो.पाच वर्षात तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.खराब रस्त्याचे झगडेफाटा ते रांजणगाव देशमुख हे उत्तम उदाहरण आहे.फक्त बोर्डबाजी करुन विकास होत नाही.त्यासाठी विकासाची दुरदृष्टी लागते जी आम्हाला विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे दिसते आहे.यावेळी साईनाथ रोहमारे, बापूसाहेब औताडे, अरुणराव येवले,अशोकराव औताडे, जितेंद्र रणशुर, बंडोपंत थोरात, संजय औताडे, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र औताडे,चंद्रकांत औताडे, शंकर औताडे, रमेश रोहमारे, सुखदेव भालेराव, रामनाथ भालेराव, संजय विघे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे