संजीवनी उद्योग समूह

धारंणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बाबासाहेब वाघ

0 5 3 7 6 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

दोन वर्षांपूर्वी झालेल्या धारंणगाव ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व सदस्य निवडून आले होते. रोटेशन पद्धत ठरल्याप्रमाणे मावळते उपसरपंच गणेश थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन उपसरपंच म्हणून बाबासाहेब वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.या लोकनियुक्त सरपंच सौ.वरूणा दिपक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.उपरपंच पदासाठी सदस्य अण्णासाहेब रणशूर यांनी बाबासाहेब वाघ यांच्या नावाची सूचना मांडली व माजी उपसरपंच गणेश थोरात यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे बाबासाहेब वाघ यांची बिनविरोध निवड झाली.

जाहिरात
जाहिरात

या प्रसंगी मा उपसरपंच गणेश थोरात यांचा सत्कार केला व नवीन उपसरपंच यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश घोडेराव,माजी संचालक दगुराव चौधरी, लोकनियुक्त सरपंच वरूणा दिपक चौधरी,नानासाहेब थोरात,सोपानराव वहाडणे,तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ वहाडणे, सोसायटीचे संचालक तुकाराम रणशूर, मा उपसरपंच दशरथ मोरे,संदीप चौधरी,दिपक सुरे,ग्रामपंचायत सदस्य, तसेच संदीप थोरात, सौ कविता संतोष चौधरी, गणेश थोरात,अण्णासाहेब रणशुर,कु मोहिनी विठ्ठल मोरे, सौ माधुरी सुरज रणशूर, सौ.पुष्पा मच्छिंद्र जाधव, सौ सोनल सुदर्शन कुहिटे, पूनम अहिरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे