महाराष्ट्र

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२४ राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन

0 5 4 1 1 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शिक्षक ध्येय,सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, प्रायोजक 2, प्रायोजक 3, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
A) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)
B) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत) पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.उपक्रम अहवाल लेखनाबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी शिक्षकांनी https://kaushalyavikas.blogspot.com किंवा https://shikshakdhyey.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एम. एस. वर्ड टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ करून ९६२३२३७१३५ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावी. या स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क असून उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रिंट प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिक देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे ५० + डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.स्पर्धेचा निकाल दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी ‘शिक्षक दिनी जाहीर करण्यात येईल.उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 या मोबाईल नंबरवर किंवा आमचे उपसंपादक, उपसंपादिका तसेच प्रतिनिधी यांचे मोबाईलवरवर संपर्क साधावा.राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड आणि मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार (जळगाव); मंजू वानखडे, अंजली वारकरी (अमरावती); वसुधा नाईक, (पुणे); अशरफ आंजर्लेकर, विद्या देवळेकर (रत्नागिरी); डी. जी. पाटील, विजय अहिरे, पुरुषोत्तम पटेल (नंदुरबार); कैलास बडगुजर, (ठाणे); सतीश बनसोडे, राजेंद्र लोखंडे, (नाशिक); धन्यकुमार तारळकर, (सातारा); मिलिंद दीक्षित (वर्धा); संजय पवार, (रायगड); कांबळे एस. जी. पाटोदेकर, (लातूर); खुशाल डोंगरवार, (भंडारा); प्रेमजीत गतीगंते, संगीता पवार मुंबई तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे