जलसमस्या सोडविणारा खरा नायक विवेकभैय्या कोल्हे – सुरेश शिंदे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
तिळवणी येथील पालखेड डाव्या कालव्यावरून पाझर तलाव भरण्यासाठी नादुरुस्त असलेल्या चारी नंबर ५१ च्या दुरुस्तीसाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दोन जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले.शेतकऱ्यांच्या हस्ते मशीनचे पूजन करून ५१ नंबर चारी करण्याचे व दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.या प्रसंगी अशोक शिंदे,शंकर शिंदे,सुरेश शिंदे, गंगाधर शिंदे, दगु गायके,मनोज तुपे,बाळू गायके, जनार्दन शिंदे,विकास शिंदे,ज्ञानेश्वर गायके, बद्रीनाथ गायके,विनोद प्रताप सिंग परदेशी, रवींद्र गायके,रवींद्र शिंदे,सतीश शिंदे,सोमनाथ शिंदे,नितीन गायके,दत्तू निकम,दिगंबर निकम,विशाल चक्के आदी.शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना सोमनाथ शिंदे म्हणाले की,समाजकारण व राजकारण अनेक नेते करताना आजपर्यंत पाहिले परंतु इतरांसारखे स्वार्थाचे राजकारण न करता काम करणारे विवेकभैय्या कोल्हे आहेत.समाजकारण डोळ्यासमोर ठेवत कालव्याचे गेट खोलून थांबले नाही तर तलावात पाणी जाते की नाही हे स्वतः पाहणी करून नादुरुस्त व बुजलेल्या चाऱ्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.अखेरपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जेसीबी व यंत्रणा दिली यामुळे स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्य सातत्याने जपणारा युवानेता म्हणून विवेकभैय्या कोल्हे यांचा अभिमान वाटतो आहे. खरोखर अशा युवा नेतृत्वाला आमचा सलाम आहे.सुरेश शिंदे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून सतत पाठपुरावा पत्रव्यवहार करून येवला विभागीय कार्यालयात धरणे आंदोलन कोल्हे यांनी केले.हक्काचे पाणी पूर्वभागात यावे म्हणून स्वतःच्या हाताने गेटचे चाक फिरवून पाणी सोडले. जेव्हा बंधाऱ्यात पाणी जात नाही म्हणून काही ठिकाणी अडचण आली तर त्या चाऱ्या दुरुस्तीसाठी काम हाती घेतले. तळागळातील शेतकऱ्यांची एवढे तळमळ असणारा एकमेव नेता आज दिसतो आहे जो या तालुक्याचे उज्वल भविष्य घडवेल असा विश्वास असल्याची भावना शेतकरी वर्गाने व्यक्त केली.