लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना त्रास होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
महायुती शासनाने महिलांसाठी ‘माझी लाडकी बहिण योजना’ आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. माता-भगिनींना या योजनेचे अर्ज भरतांना कोणत्याही अडचणी येणार नाही व त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना दिल्या आहेत.महायुती शासनाने राज्यातील महिलांसाठी १ जुलै पासून ‘माझी लाडकी बहिण योजना’ सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून २१ वर्ष ते ६० वर्ष वयापर्यंतच्या माता-भगिनींना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.
आ.आशुतोष काळे यांच्याकडून सहाय्यता केंद्र सुरुज नसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महिलांना सखोल मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज देखील भरून घेतले जात आहेत. त्यासाठी कोपरगाव शहरासह मतदार संघात सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले असून महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा.-आ.आशुतोष काळे
या योजनेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाच्या अर्जासोबत दिलेल्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.या कागदपत्रांमध्ये उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल (अधिवास प्रमाणपत्र), जोडणे आवश्यक आहे. मात्र हि कागदपत्रे महिलांना वेळेत उपलब्ध होवून पात्र महिलांचे अर्ज वेळेत दाखल होणे आवश्यक आहे. त्यासाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला, अदिवासी प्रमाणपत्र वेळेत मिळावे यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात नियमित हजर राहणे गरजेचे आहे. जेणेकरून आवश्यक असणारे कागद-पत्र मिळविण्यात महिलांना कोणतीही अडचण येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी अशा सूचना तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.