एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘अवयवदान संकल्पा’ची प्रतिज्ञा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम, आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान संकल्प अभियान कार्यशाळा घेण्यात आली.सदर कार्यशाळेचा हेतू अवयवदान अभियान चळवळ राबविणे हा होय. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अशोक गाविते साईबाबा हॉस्पिटल शिर्डी हे उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ.अशोक गाविते म्हणाले ‘मृत्यूनंतर अवयवदान करून कुणाचे तरी जीवन फुलवू या.’ हा विचार समाजातील हजारो नागरिकांपर्यंत या संकल्पद्वारे गेला पाहिजे. त्यांनी आपल्या भाषणात अवयवदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.‘अवयव दान कसे करतात, अवयव दान कोण करू शकते’ या विषयी महत्वपूर्ण चर्चा केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. डॉ. मोहन सांगळे हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगत ते म्हणाले की, ‘अवयवदानाबाबत जनजागृती होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही जनजागृती विद्यार्थ्यांमधूनच होऊ शकते,’ असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना अवयवदान अभियान चळवळीची प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या आरोग्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रतिभा रांधवणे यांनी केले. या कार्यक्रमाला इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. यशवंत माधव, प्रा. सुनील काकडे, प्रा. डॉ. सीमा दाभाडे, प्रा.संजय गायकवाड, प्रा.मोहित गवारे यांसह सर्व सहकारी प्राध्यापक तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका पवार यांनी केले. तर आभार प्रा. पी. जे. हाडोळे यांनी मानले.