सरकारी कागदपत्रांवर आता वडिलांसोबत आईचे नाव बंधनकारक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
राज्य सरकारने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारी कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे ही नाव लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्याची अंमलबजावणी बुधवार दिनांक १ मे २०२४ पासून केली जाणार आहे तसेच कोणत्या कागद पत्रावर लागणार आईचे नाव तर यापुढे सर्व अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे त्यानुसार जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची उतारे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच विवाह नोंदणी प्रमाण पत्रांवर ही आईचे नाव सरकारी कागद पत्रासह यापुढे मुला मुलींच्या विवाह नोंदणी प्रमाण पत्रांवर ही आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे याआधी केवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर वडिलांचे नाव लावले जात होते मात्र या पुढे वधूवरांच्या आई-वडिलांची नावे लिहावी लागणार आहेत याबाबत ११ मार्च २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून होणार आहे तसेच १ मे नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करतांना वडिलांच्या अगोदर आईचे नाव येईल म्हणजेच सुरुवातीला पालकाचे नाव त्यानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर शेवटी आडनाव याप्रमाणे नोंद केली जाणार आहे तसेच महसूल, शासकीय कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे विविध परीक्षा या सर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आईचे नाव टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली त्यानुसार राज्य सरकारने शासकीय अध्यादेश काढण्यात आला हेच नाही तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जालना बाहेरील पाटी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करतांना स्वतःच्या दालना बाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अशी पाटी लावली यापुढे शासकीय दस्त ऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून केली आहे याबाबतचा अध्यादेश १४ मार्च २०२४ रोजी काढण्यात आला ज्याप्रमाणे माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो तेच श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे समाजात वडिलां एवढेच आईचे महत्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला गेल्या बऱ्याच वर्षापासून हा मुद्दा गाजत होता की शासकीय कागदपत्रांवर वडिलांप्रमाणेच आईचे देखील नाव असावे शेवटी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली हा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागणार आहे.