नामदेवरावजी परजणे पाटील (अण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरणा निमित्त २२ जून रोजी मंत्री महोदयांच्या हस्ते गौरवपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवरावजी परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त संघाच्या कार्यस्थळावर रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे तसेच महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री ना. अतुल सावे तसेच पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोदावरी दूध संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा, तसेच स्वच्छ आणि निर्भेळ दूध पुरवठा, दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांचा सन्मान तसेच सर्वाधिक कृत्रिम गर्भधारणा करणारे कृत्रिमरेतन तज्ञांचा सन्मान त्याचप्रमाणे अपघाती निधन पावलेल्या संघातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दूध संघाचे चेअरमन राजेश नामदेवरावजी परजणे पाटील हे असणार आहे तेव्हा गोदावरी दूध संघास दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी तसेच विविध दूध संस्थांचे पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे पाटील यांनी केले आहे.