संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु. कॉलेज ‘व्हीजनरी मॅनेजमेंट’ पुरस्काराने सन्मानित

0 5 4 1 2 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला उत्कृष्ट निवासी संस्था असा दर्जा देवुन अनेक निकषांच्या आधारावर इंडियन स्कूल्स अवार्ड या संस्थेने ‘व्हीजनरी मॅनेजमेंट अवार्ड’ने सन्मानित केले. संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी हा पुरस्कार मुंबईच्या हॉटेल मॉरीओट येथे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला कुस्तीमध्ये पहिले सुवर्णपदक मिळवुन देणाऱ्या फ्रीस्टाईल कुस्तीपटू गीता फोगट व इंडियन स्कूल्स अवार्ड या संस्थेचे सहसंस्थापक अक्षय अहुजा यांचे हस्ते स्वीकारला.

जाहिरात
जाहिरात

या पुरस्काराने संजीवनीच्या वैभवात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या पुरस्काराबध्दल प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. इंडियन स्कूल्स अवार्ड या संस्थेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.इंडियन स्कूल्स अवार्ड या संस्थेने विशेषतः संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजला मिळालेले दर्जेदार शाळा प्रशासन कार्यक्रम अंतर्गत भारत सरकारकडून प्राप्त झालेले ‘नॅबेट’ मानांकन , राज्य व देश पातळीवर विविध वकृत्व स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले प्राविण्य,

जाहिरात
जाहिरात

३१ विद्यार्थ्यांच्या ब्रास बॅन्ड पथकाने संरक्षण मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत सार्वजनिक सुचना संचालनालय, मध्य प्रदेश सरकारने भोपाळ येथे पश्चिम विभागीय महाराष्ट्र , दिव दमण, गुजरात, दादरा नगर हवेली, गोवा, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतील व केद्रशासित प्रदेशातील ब्रास बॅन्ड २०२४-२५ या स्पर्धांमध्ये शानदार प्रदर्शन करून मिळविलेला दुसरा क्रमांक तसेच विविध खेळांच्या स्पर्धामधिल मिळविलेले बक्षिसे, ब्रास बॅण्ड पथकाचे शिस्तबध्द संचलन, कवायती, विद्यार्थ्यांची उत्तम राहण्याची व जेवणाची सोय, वैद्यकिय सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा , विस्तिर्ण खेळाची मैदाने, अशा अनेक बाबी तपासुन येथिल व्यवस्थापन दूरदृष्टीचे आहे, यावर शिक्कामोर्तब करून संस्थेस व्हीजनरी मॅनेजमेंट अवार्डने सन्मानित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे