संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजचा रौप्य महोत्सव संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
२००१ साली माझ्या वडीलांनी संजीवनी सैनिकी स्कूलच्या प्रवेशाची जाहिरात वर्तमानपत्रात पाहीली आणि मला येथे दाखल केले. त्यामुळेच माझो करीअर घडले. माझ्या दुसऱ्या भावालाही येथे दाखल केले. आज तो भंडारा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी आहे. आम्ही श्रीगांदा तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागातील आहोत, परंतु संजीवनीमुळे आमच्या जीवनाला संजीवनी मिळाली. शालेय शिक्षणातील प्रवास खुप महत्वाचा असतो.याच शिक्षणात खरी पुढील आयुष्याची जडण घडत होत असते. संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये मला शिस्त , दैनिंदिन दिनचर्याचे शिस्तबध्द वेळापत्रक या बाबींचा अनुभव असल्यामुळे मी पुढील शिक्षणासाठीही तसाच अवलंब केला. त्यांचा फायदा मला पुढील उच्च शिक्षणासाठी तसेच एमपीएससी परीक्षेसाठी झाला आणि मी उपशिक्षणाधिकारी होवु शकलो. याचेसर्व श्रेय मी संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये माझ्या घडलेल्या पाया भरणीला देतो. सध्याच्या विद्यार्थ्यांनी सध्या जरी सैनिकी स्कूलच्या शिस्तीमुळे खुप मोठे स्वातंत्र्य मिळत नसले तरी येथे आपल्या भावी आयुष्याची पायाभरणी होत असते, हे लक्षात घेवुन रोजची दिनचर्या गांभिर्याने पुर्ण करावी, कारण संजीवनी सैनिकी स्कूलमुळे अनेक कुटूंब घडले आहेत.

ध्येय उच्च ठेवा आणि आपले करीअर घडवा’, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी व संजीवनी सैनिकी स्कूलचे माजी विद्यार्थी सुरज वागस्कर यांनी केले.संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात वागस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. प्रारंभी संजीवनी सैनिकी स्कूलच्या प्रांगणात असलेल्या ‘अमर जवान’ स्मारकाला मान्यवरांकडून मानवंदना देण्यात आली. तसेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांकडून युध्दात वापरलेल्या दोन तोफांची (आरसीएल १०६/३२) जबलपुर येथुन आनलेल्या उभारणी करण्यात आली. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, प्रमुख अतिथी सुरज बावस्कर , दुसरे अतिथी डॉ.राहुल जाधव, डायरेक्टर (नॉन अकॅडमिक) डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस प्रशाकीय अधिकारी विजय भास्कर, उपप्राचार्य बी. एल. सोमासे, वसतिगृह प्रमुख अनिल कोल्हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लाठी काठी, झुमरींग व रॅपलिंग या खेळांचे साहसी प्रात्यक्षिके दाखवुन सर्वांचीच मने जिंकली. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतात आम्ही येथे कसे घडत आहोत, आमच्यासाठी येथिल शिक्षक किती प्रयत्नशील आहेत,याचे विश्लेषण केले. वागस्कर म्हणालेे की आत्ता आपल्याला संजीवनी सैनिकी स्कूल मधिल दिनचर्याचे महत्व कळत नाही तर ते भविष्यात कळते.

कारण एमपीएससी परीक्षेत सुमारे ३ लाख विद्यार्थी आपले नशीब अजमावतात, त्यातुन फक्त ३०० ते ३५० विद्यार्थी निवडले जातात. त्यात मला संधी मिळाली. कारण मी संजीवनी स्कूल मधुन बाहेर पडल्यावर देखिल पुढील अभ्यासाठी संजीवनीची दिनचर्या आत्मसात केली. दुसरे अतिथी व माजी विद्यार्थी डॉ. राहुल जाधव म्हणाले की शालेय शिक्षणात आपली शिक्षण देणारी संस्था ही मातृ संस्था असते. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांनी चुका केल्यातर शिक्षक पाठीवर मार द्यायचे, परंतु भविष्यात यशस्वी झाल्यावर तेच शिक्षक व इतरही आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, हे डोळ्यात अंजन घालणारे आहे. जुन्या घराच्या आठवणी असतात परंतु नव्या घराची स्वप्ने असतात, येथील जुन्या आठवणींना विसरून नविन क्षितीजे शोधा असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.
बिबट्याच्या जबड्यातून नातवाला वाचवणाऱ्या आजोबाला सलाम- सुमित कोल्हे
या वेळी बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की स्व. शंकरराव काल्हे यांनी इतर संस्थांबरोबरच संजीवनइ प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटरची स्थापना केेली. त्यांचे देशप्रेम उत्कट होते. आज पावेतो सुमारे २००० पेक्षा अधिक कॅडेटस् सैन्यदलाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. म्हणुन ग्रामिण भागातील नवयुवक सैनिकी अधिकारी बनावे, या हेतुने त्यांनी सैनिकी स्कूल ची सुरूवात केली. या संस्थेमधुन अनेक विद्यार्थी घडले आणि ते उच्च पदावर कार्यरत आहेत. साहस, धाडस काय असते, यासाठी आपण मच्छिंद्र आनंदा आहेर यांना बोलविले आहे व त्यांचा यथोचित सत्कारही केलेला आहे. मच्छिंद्र आहेर हे आपला नातु कुणाल याला घेंवुन उसाच्या पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करीत होते. तेवढ्यात उसातील बिबट्याने कुणाल वर झडप घातली आणि १०० फुट आत घेवुन गेला. कुणाल ओरडला बाबा. बाबा आवाजाच्या दिशेने धावले आणि चक्क बिबट्याच्या जबड्यातून नातवाला सोडविले. ही बाब साधी नाही. अशी शूर विरता पाहीजे. अशीच शूर विरता जोपासण्यासाठी संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजची वाटचाल सुरू आहे. संजीवनीचे विद्यार्थी भविष्यात एनडीए मध्ये दाखल व्हावे, यासाठी एनडीए प्रशिक्षकांचीही नेमणुक केलेली आहे, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी कुणालच्या सैनिकी स्कूलच्या शिक्षणाची जबाबदारीही सुमित कोल्हे यांनी स्वीकारली .शेवटी संगित शिक्षक महेश गुरव यांच्या सेक्सोफोन या या वाद्यातुन वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.