प्रकाश दुशिंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आमदार आशुतोषदादा काळे व चैताली ताई काळे यांचा प्रकाश दुशिंग यांनी केला भव्य सत्कार

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

कोपरगाव शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला याप्रसंगी राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग रावसाहेब साठे दिनकर खरे संदीपजी पगारे शंकर घोडेराव मनोज शिंदे संतोष शेजवळ रोशन शेजवळ राजेंद्र खैरनार यांच्यासह समाजातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते आमदार आशुतोष दादा काळे व चैताली ताई काळे यांचा शाल पुष्पगुच्छ व क्रेनच्या सहाय्याने तयार केलेला २५१ किलो गुलाबाच्या फुलांचा हार

जाहिरात
जाहिरात

यावेळी आमदार आशुतोष दादा काळे व चैताली ताई काळे यांना घालण्यात आला याप्रसंगी संतोषजी कोपरे मधुकरजी कोपरे (गुरुजी) साहेबरावजी कोपरे प्रशांत कोपरे खिवराजी दुशिंग आदींसह समाजातील विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी साजरा करण्यात आला याप्रसंगी कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातील लाखोंच्या संख्येने भिम अनुयायी यावेळी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम हा कोपरगाव शहरात इतिहास निर्माण करणारा ठरला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी प्रकाश दुशिंग यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम आणल्याबद्दल समाजाच्या वतीने आमदार आशुतोष दादा काळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

3/5 - (2 votes)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे